सरनोबतवाडी पंचायत

स‌रनोब‌त‌वाडी हे गाव‌ कोल्हापुर पासुन‌ अव‌घ्या 2 कि.मि. आंत‌राव‌र आहे. पुर्वापास‌ लोक‌ या गावाला टेकाचीवाडी असे म्हण‌त‌ होते. स‌रनोब‌त‌ सरकार यांनी गा‍वा‍तील घ‌‍रां‍सा‍ठी जा‍गा‍ व शेत जमीन इना‍म म्ह‌णुन दिली म्ह‌णुन‌ त्यांच्या‍ आ‍डनावा‍नेच‌ गाव‌चे नाव‌ स‌रनोब‌तवाडी असे झाले. शेती हा‍ मुख्य‌ व्य‌वसा‍य असलेने  गा‍वा‍ला चांग‌ले वै‍भ‌‍व प्राप्त‌ आ‍हे. रा‍जा‍रा‍म महा‍रा‍ज पुर्वी हत्ती घोडे घेउन शि‍का‍रीला‍ जा‍त असत, त्यावेळी लोकांना‍ व जना‍वरांना‍ पिण्य़ाच्या पाण्या‍ची चण‌‍चण‌‍ भा‍सत असे म्हणुन‌ रा‍जा‍रा‍म महा‍रा‍जांनी तला‍व बांध‌‍लेला‍ आहे.

या‍ तला‍वा‍चे वै‍शिष्ट‌य‌ म्ह‌ण‌जे कोण‍त्या‍ही प्रका‍रचे सि‍मेंट‍ वा‍ळु न वा‍प‍रता‍ फक्त‌ का‍ळी मा‍ती वा‍प‍रुन तला‍व बांध‌‍लेला‍ आ‍हे. या‍ तला‍वामुळे ९० एकर जमीन पाण्या‍खा‍ली आ‍लेली असुन‌ ‍पाण्या‍चा‍ प्रश्न‌ त‌लावामुळे सुट‍ला‍. या‍ तला‍वा‍ला‍ रा‍जा‍राम तला‍व म्ह‌णुन‌ ओळ‍ख‌ले जा‍ते. गा‍वा‍त हनुमा‍न मंदीर, वि‍ठ्ठल मंदीर, दत्त‌ मंदीर,‍बा‍ला‍जी मंदीर व श्री शि‍वना‍थ्‍ भ‌क्त‌ मंडळ‍ (आध्यात्मिक केंद्र) आहे. तसेच या‍ मठा‍मध्ये जगन्ननाथ‌ महा‍रा‍ज यांनी आध्यात्मिकतेचा वेळ‍ वा‍ढवलेला‍ आ‍हे. त्यांच्या‍ प‌श्चात‌ संतोष‌‍ महा‍रा‍ज यांनी प‌रिसरातील‌ १० ते १५ गा‍वा‍तील लोकांना‍ आध्यात्मिक ध्या‍न केंद्रा‍मधुन व्य‌सनमुक्ती दारुबंदी आ‍दी शिक‌व‌ण‌‍ दिलेली आ‍हे.

गा‍वा‍मध्ये भ‌ज‌णी मंडळ‍ आ‍हेत, दर गुरुवा‍री मठा‍मध्ये व दर श‌‍नि‍वा‍री बा‍ला‍जी मंदीरा‍मध्ये भजणी मंडळ‍ सेवा‍ करता‍त. गा‍व १००% हगणदा‍री मुक्त‌ असुन गांवाला निर्म‌ल‌ग्राम‌ पुरस्कार देण्यात आलेला‍ आ‍हे. पुरस्कारातून‌ मिळालेल्या २ ला‍ख‌‍ रुप‍ये रक्क‌मेतून‌ गट‌र्स‌ व रस्त्यांची कामे केली आहेत. गाव‌च्या विकासासाठी स‌र्व‌ तरुण मंडळे व‌ समस्त‌ गा‍वकरी मंडळींचे स‌ह‌कार्य‌ व‌ श्रमदा‍न‌ लाभ‌ले आहे. निर्म‌ल‌ गा‍व व स्व‌च्छ‌ता का‍मासा‍ठी बॅंक‌ ऑफ बरोडा व‌ ग्रा‍मपंचा‍यत सदस्य‌ स‌मितीच्या सा‍हकार्या‍तुन आ‍ज अखेर १०० % शौचा‍लये पुर्ण‌ होत आ‍हेत. आमदा‍र सतेज उर्फ‌ बंटी पाटील यांच्या स्थानिक‌ विकास‌ निधीतून‌ ७५% रस्ते व‌ गटार्स‌ची कामे झा‍ली आ‍हेत.